पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दमदार कारवाई; सहा जणांना अटक, १ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
बिलोली : कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बिलोली पोलिसांनी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेला बिलोलीत पोलीस निरीक्षक बाबाराव रोकडे यांनी प्रभावीपणे पुढे नेले आहे.
गोपनीय माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता कारवाईचे नियोजन करून छापा टाकण्याची तत्परता दाखवत, रोकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धडक दिली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
रोकडे साहेबांच्या कार्यपद्धतीची परिसरात चर्चा!
बिलोली पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक बाबाराव रोकडे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुप्त माहितीची पडताळणी, योग्य नियोजन आणि अचानक कारवाई यामुळे जुगार अड्ड्यावर पोलिसांना मोठे यश मिळाले.
‘कायदा मोडणाऱ्यांची गय नाही’ ही भूमिका ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून रोकडे साहेबांची कार्यतत्परता या कारवाईतून दिसून आली. त्यांच्या नेतृत्वाखाली बिलोली पोलिसांकडून होत असलेल्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणी सुरेश दत्ता कनकटे यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा!
जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असून, कायद्याला बगल देऊन अवैध धंदे चालविणाऱ्यांनी आता सावध व्हावे, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक बाबाराव रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



