🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अकिल शहा
साक्री: साक्री तालुक्यात महामार्गांचे रुंदीकरण आणि नवीन बायपास (बाह्यवळण) रस्ते झाल्यापासून ग्रामीण भागातील प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः साक्री शहरापासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या शेवाळी(दा.) गावात अनेक आगारांच्या एसटी बसेस जुन्या मार्गाने गावात न येता थेट बायपास मार्गे सुसाट निघून जातात. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी “एसटी आमच्या हक्काची, ती गावातूनच आली पाहिजे” अशी भूमिका घेत, बसेस बायपास मार्गे न नेता गावातून सोडण्याची जोरदार मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, साक्री शहरापासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या शेवाळी(दा.) गावातील प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार घेवून ग्राम सुधार मंडळाचे शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांची भेट घेतली या वेळी गावातील नागरिक तथा समाजसेवक नाना वाघ यांनी आगार व्यवस्थापक अहिरे यांचा परिचय करून देत त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा कौतुक केला. ग्राम सुधार मंडळाच्या शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आगार व्यवस्थापक अहिरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत तात्काळ दखल घेऊन इतर (नंदुरबार,नवापूर) आगार प्रमुखांशी संपर्क साधून बसेस शेवाळी मार्गे वळविण्याची विनंती व सुचना केल्या तसेच साक्री आगारातील सर्व वाहन चालक व वाहकांना शेवाळी मार्गे बसेस नेण्यासाठी सहाय्यक वाहतूक अधिक्षक राकेश वाघ,वाहतूक निरिक्षक प्रफुल पाटील,वाहतूक नियंत्रक वसीम पठाण यांना बोलावून सूचना देण्याचा आदेश दिला. शेवटी ग्रामस्थांच्या वतीने आगार व्यवस्थापक अहिरे यांना निवेदन देण्यात आले व तसेच निवेदनाची दखल घेतल्या बाबत समाधान व्यक्त करीत आगार व्यवस्थापक अहिरे यांचे आभार मानले.
*आगार व्यवस्थापक अहिरे यांचे आश्वासन:-* साक्री आगारातील बसेस शेवाळी येथे थांबा घेत आहेत तरी काही बसेस बाय पास मार्गे जात असल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली त्याची तात्काळ दखल घेत जे काही वाहक चालक शेवाळी मार्गे बसेस नेणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
यावेळी ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव साळुंके, सेवानिवृत्त शिक्षक तथा ग्रा.सु.मं. सचिव सुरेश साळुंके, माजी तहसिलदार तथा ग्राम सुधार मंडळाचे सदस्य भालेराव साळुंके, माजी नाशिक जिल्हा नियंत्रण कृषी अधिकारी प्रभाकर साळुंके, पोपटराव साळुंके, नाना वाघ व तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



