नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेत तडीपार आदेशाचा भंग; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई; नागोबा कट्टा व श्रीकांत चौकातून दोघांना ताब्यात

🚨DPT NEWS🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी राजेंद्र पवार 

मिरज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरज शहर पोलिसांकडून रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईदरम्यान तडीपार आदेशाचे उल्लंघन करून मिरज शहरात आढळून आलेल्या दोन आरोपींविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिरज शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुव राहुल भोरे (वय २२, रा. कमानवेस, मंगळवार पेठ, मिरज) आणि विश्वेश धोंडीराम घोडके (वय २५, रा. गोठण गल्ली, मिरज) यांच्याविरुद्ध तडीपार आदेश जारी करण्यात आला होता. मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांच्या आदेशानुसार दोघांना १९ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ अखेर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी क्रमांक एक धुव राहुल भोरे हा नागोबा कट्टा येथे, तर आरोपी क्रमांक दोन विश्वेश धोंडीराम घोडके हा श्रीकांत चौक, मिरज येथे तडीपार आदेशाचा भंग करून आढळून आला.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरज शहर पोलिसांकडून समाजकंटक तसेच रेकॉर्डवरील आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, सहायक पोलीस फौजदार निलेश कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन मोरे, झाकीर काझी, राजेश गवळी तसेच पोलीस कर्मचारी केंगार, योगेश विटेकरी, मिलिंद पाटोळे, स्वप्नील नायकोडे आणि सव्यद मिरज यांचा सहभाग होता.गणेशोत्सव काळात शांतता भंग करणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असून, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे मिरज शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:21 am, September 25, 2026
27°C
टूटे हुए बादल
68 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:20 am
Sunset: 6:25 pm
Translate »
error: Content is protected !!