नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन; शहापुरात एकावर गुन्हा दाखल

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

शहापूर, इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवराज उर्फ बाळू शिवाजी पताडे (वय ३४, रा. गणेशनगर, गल्ली नं. ३, शहापूर, इचलकरंजी) याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसीलदार, इचलकरंजी यांनी आदेश क्र. फौजदारी/वशी/श.२/२०२६, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ अन्वये १४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हातकणंगले तालुक्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२), (३) अन्वये प्रवेशास बंदी घातली होती. सदर आदेशाची बजावणी संबंधित व्यक्तीस १२ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.

असे असतानाही युवराज पताडे हा २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता गणेशनगर गल्ली नं. ३ येथील गणपती मंदिराच्या मागील बाजूस परिसरात आढळून आला. प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती असूनही त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र डावाळे (ब.नं. १३३३), नेमणूक शहापूर पोलिस ठाणे, यांनी दिली.

या फिर्यादीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार कांबळे (ब.नं. १३७३) करीत आहेत.

कारवाईमध्ये सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे, पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय पाटील (ब.नं. १२२०), पोलिस कॉन्स्टेबल रोहित पाटील (ब.नं. २३५) व पोलिस कॉन्स्टेबल भरतकुमार मोळके (ब.नं. १४५४) यांनी सहभाग घेतला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:18 am, September 25, 2026
27°C
टूटे हुए बादल
68 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:20 am
Sunset: 6:25 pm
Translate »
error: Content is protected !!