नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तुळजापूरमध्ये तरुणीच्या छेडछाडीतून १८ वर्षीय तरुणाची हत्या; ३ आरोपींसह ८ जणांवर गुन्हा दाखल

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी परवेज शेख

तुळजापूर: मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप करत एका १८ वर्षीय तरुणाची लाकडी काठी आणि पट्ट्याने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे. या मारहाणीत मृत तरुणाचा मित्रही गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
समीर जब्बर पटेल (वय १८, रा. वेताळनगर, तुळजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर अरबाज अफसर सय्यद असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास भारतीबुवा मठाशेजारील पार्किंग परिसरातील वॉचमनच्या खोलीमागे ही घटना घडली. मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याच्या कारणावरून संतोष देविदास कदम, संजय विलास जाधव, प्रणव देवकते आणि त्यांच्या इतर पाच साथीदारांनी समीर पटेल याला गाठून काठ्या व पट्ट्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने समीरचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला अरबाज सय्यद हादेखील जखमी झाला.
या प्रकरणी मृत समीरचे नातेवाईक अन्सर जब्बार पटेल (वय ३५, रा. वेताळनगर, तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात संतोष कदम, संजय जाधव, प्रणव देवकते यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये खुनाचा आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:43 pm, November 5, 2026
31°C
साफ आकाश
27 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!