🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अकिल शहा
साक्री : दिवाळी हा सण जसा दिव्यांचा असतो तसाच तो रंगांची मुक्त उधळण करणाऱ्या रांगोळ्यांचादेखील असतो. मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी रांगोळी अंगणात काढण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात पूर्वापार आहे. त्यातच साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.)येथे दिवाळी सणानिमित्त गावातील राज्य परिवहन महामंडळ साक्री आगारातील (कर्मचारी) बस चालक अतुल राजाराम साळुंके यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा साळुंके यांच्या आकर्षक रांगोळीने गावातील सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले रांगोळी काढणे ही एक कला असून अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांच्या माध्यमाने समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दिवाळी सण हा फक्त हिंदू धर्माचा सण नसून सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आनंदात एकोपात साजरा करण्याचा हा सण असून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा सण आहे. शेवाळी गावात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.



