नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

CEIR पोर्टलच्या प्रभावी वापरातून मेहुणबारे पोलिसांची कामगिरी; ५ लाखांचे २० गहाळ मोबाईल हस्तगत

🚨दर्शन पोलीस टाइम🚨

प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला

​मेहुणबारे: मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०२६ मध्ये हरवलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या प्रभावी वापरातून अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे एकूण २० मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेचा उपयोग करत विशेष मोहीम राबवली. यामध्ये काही मोबाईल इतर जिल्ह्यांमधून, तर काही मोबाईल शेजारील मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथून शोधून काढण्यात आले. पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी तांत्रिक तपास व CEIR पोर्टलच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

​हस्तगत केलेले सर्व २० मोबाईल फोन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांना व तक्रारदारांना परत करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा हाती आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

​ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आली. नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून देण्यासाठी तांत्रिक माध्यमांचा वापर पुढेही सुरू राहील, असे मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:07 am, November 20, 2026
18°C
साफ आकाश
33 %
3 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 6%
Visibility: 10 km
Sunrise: 6:44 am
Sunset: 5:49 pm
Translate »
error: Content is protected !!