नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गोवा बनावट मद्य,बलेनो कारसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त.चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड 

कोल्हापूर :- गोवा बनावटीचे विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज पथकाने धडक कारवाई केली. आजरा तालुक्यातील सुळेरान गावच्या हद्दीत आंबोली-आजरा मार्गावर सापळा रचून मारुती सुझुकी बलेनो कारसह एकूण ९ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३८ बॉक्स जप्त करण्यात आले असून वाहनचालक दीपेश उमेश सावंत (रा. मधळीवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सुळेरान गावच्या हद्दीत आंबोली-आजरा रस्त्यावर पथकाने सापळा रचला. यावेळी एमएच ०७ एबी ७०५० क्रमांकाची ग्रे रंगाची बलेनो कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे ३८ बॉक्स आढळून आले. जप्त मद्याची किंमत ३ लाख १ हजार २०० रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत ६ लाख रुपये असून एकूण ९ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई विभागीय उपायुक्त स्नेहलता नरवणे, कोल्हापूरचे अधीक्षक तसेच उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, आर. सी. केरीपाळे, एस. एम. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम. आर. लाडके यांच्यासह जवान भरत सावंत, संदीप चौगुले, ऋषिकेश इंगळे, वाहनचालक अविनाश परीट आणि महिला जवान स्वप्नाली बेडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ जानेवारी ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली. या कालावधीत एकूण २ हजार ५६० गुन्हे दाखल करून २ हजार २५२ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी ९८ लाख ६४ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या मद्याविरोधात १२६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये ५४ वाहनांसह ६ कोटी ३० लाख ९४ हजार ६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 pm, November 24, 2026
26°C
साफ आकाश
38 %
15 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 2%
Visibility: 10 km
Sunrise: 6:46 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!