नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत राजकीय वरदहस्तामुळे अवैध धंद्यांना ऊत- पोलिस राजकीय हस्तक्षेप सोडून नागरिकांचे हित जपणार काय?

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – निवास गागडे इचलकरंजी

कोल्हापूर :- इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अवैध जुगार, मटका,गुटखा विक्री, मावा,
अनधिकृत दारू विक्री, गांजा तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्थानिक स्तरावर काही राजकीय व्यक्तींच्या वरदहस्तामुळे हे अवैध धंदे निर्भयपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.विशेष म्हणजे अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई केले जात असले तरी मुख्य सूत्रधारांवर मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अवैध धंद्यांमुळे शहरातील तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत असून सामाजिक वातावरण बिघडत आहे.अवैध व व्यसनाधीन तरुण वर्ग तयार होत असुन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत चालली आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष व कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.इचलकरंजी शहरातील पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांचे मूळ शोधून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी अपेक्षा नागरिकांच्यातुन व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:42 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
62 %
11 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 80%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!