नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

उंबरखेड येथे सार्वजनिक गणेश मंडळात ‘सामूहिक आरोग्य अभियान’ संपन्न; १०७ नागरिकांची झाली रक्त तपासणी

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला 

चाळीसगाव, उंबरखेड :- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘श्रीगणेशा आरोग्याचा, सामूहिक आरोग्य अभियान २०२६ – पल्ला तिशीचा’ या उपक्रमांतर्गत दिनांक १७/०९/२०२६ रोजी उंबरखेड येथील सार्वजनिक गणेश मंडळात भव्य आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जळगावचे आरोग्य अधिकारी मा. डॉ. सचिन भायेकर सर, जिल्हा हिवताप अधिकारी मा. डॉ. प्रमोद सोनवणे सर आणि चाळीसगावचे तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. प्रशांत बोरसे सर यांच्या पूर्वलक्षी सूचनेने हे शिबिर पार पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेडचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. अशहर अंजुम सर व मा. डॉ. प्रियंका शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक श्री. एस. नागरे, श्री. आर. कोल्हे साहेब आणि आरोग्य सेविका श्रीमती एस. जे. बाविस्कर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे शिबिर संपन्न झाले.

१०७ रुग्णांची तपासणी व उपचार सल्ला

गावातील ३० वर्षांवरील स्त्री व पुरुषांचे आरोग्य अबाधित राहावे आणि त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी गणेश मंडळाच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब (BP), मधुमेह (Diabetes), संशयित क्षयरुग्णांच्या (TB) थुंकीचे नमुने आणि हिवतापाचे (Malaria) रक्तनमुने संकलन करून एकूण १०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रक्तदाबाचे ११, मधुमेहाचे १६ आणि संशयित क्षयरुग्ण ०१ आढळून आले. या सर्व रुग्णांना आरोग्यविषयक सल्ला व समुपदेशन करण्यात आले, तर अतिजोखीम असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड येथे संदर्भीत (Refer) करण्यात आले.

उत्कृष्ट नियोजन आणि नागरिकांचे समाधान

या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम प्रमुख आरोग्य सेवक श्री. एन. एन. विसपुते आणि आरोग्य सेविका श्रीमती एस. ए. साळवे यांनी केले. गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. शंतनू संभाजी करपे, उपाध्यक्ष श्री. नितीन भिकन गायकवाड तसेच आरोग्य विभागाच्या सर्व आशा स्वयंसेविकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे ग्रामस्थांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाली, ज्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यापुढेही प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड तर्फे अशाच विविध आरोग्यविषयक उपक्रम व जनजागृती अभियानांचे आयोजन केले जाईल, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले असून ग्रामस्थांनी त्यास असेच सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:27 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
41 %
6 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 34%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!