नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कळंबा कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा न्यायाधीन बंदींचा हल्ला, शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूर कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्रेणी-१ यांच्यावर सहा न्यायाधीन बंदींनी हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कारागृहातील मंडल अधिकारी कार्यालयात घडली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी प्रकाश फुन्नू चव्हाण (वय ५०), हे कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्रेणी-१ म्हणून कार्यरत आहेत. दि. १४ सप्टेंबर रोजी सर्कल क्रमांक १ मधील बॅरेक क्रमांक ३ व ४ यांच्या मधील जिन्यामध्ये काही बंदी दंगा करून आरडाओरड करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी चव्हाण यांनी संबंधितांना कारागृहा
-तील शिस्त पाळण्याच्या सूचना केल्या होत्या.या घटनेचा राग मनात धरून बुधवारी सकाळी सुमारे ९.४० वाजता सहा न्यायाधीन बंदी परवानगीशिवाय त्यांच्या केबिनमध्ये आल्याचा आरोप आहे. त्यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान न्यायाधीन बंदी अलताफ शरीफ याने हातातील दगडाने चव्हाण यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून हात वर केल्याने दगड त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर लागून दुखापत झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी चव्हाण यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे. कारागृहातील नियमांचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी न्यायाधीन बंदी अलताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशितोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर आणि शाहिद मन्सूर सय्यद या सहा जणांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १९१(२) व १९१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पडवळ करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी राऊत यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:26 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
41 %
6 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 34%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!