नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीवर छापा; ४ जण अटकेत

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संजय दिंडे

कोल्हापूर :- आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. कागल नजीक हायवेवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर हायवेवरील एका हॉटेलमधील रूम नंबर १०२ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि सागर वाघ यांच्या पथकाने ४ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकला.
यांना अटक करण्यात आली:
१. अजित बाळासो कोरवी (वय २९, रा. इचलकरंजी) – हा सट्टा अड्ड्याचा मालक असल्याचे समोर आले आहे.
२. फारुख नजीर मुल्लाणी (वय ३८, रा. रेंदाळ, हातकणंगले)
३. जितेंद्र आप्पासाहेब घोडके (वय ५०, रा. चिकोडी, बेळगाव)
४. जॉन्सन जेरुन फर्नांडीस (वय ३४, रा. मुरगुड, कागल)
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे मोबाईल हँडसेट आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३,०५,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:35 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!