नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रतन मोरे यांची उल्लेखनीय कामगिरी बद्दल, पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव

*निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मयुर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, दुहेरी हत्याकांडाचा अवघ्या दोन तासांत उलगडा करणाऱ्या पोहेकॉ रतन मोरे यांची उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव*

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री : समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल दिवस-रात्र अथक परिश्रम घेत असते. अनेकदा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळेच जनतेचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होत असतो. अशाच एका धाडसी, तत्पर आणि कौशल्यपूर्ण कामगिरीची नोंद निजामपूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात झाली आहे.
निजामपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ व २३८ अन्वये दाखल झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत उलगडा करून आरोपीस अटक करण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन उत्तम मोरे व त्याचा टिमने यां महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही कामगिरी सपोनि मयुर भामरे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडली.
दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते. अशा संवेदनशील परिस्थितीत सपोनि मयुर भामरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने वेगाने सूत्रे हलवली. पोहेकॉ रतन मोरे व टिम ने गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि तपासातील बारकावे यांचा अचूक वापर करत आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गुन्ह्याचा केवळ दोन तासांत छडा लागला आणि आरोपीला अटक करण्यात यश आले.
ही केवळ एक तपासाची यशोगाथा नसून पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि व्यावसायिक कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे. अशा प्रकारच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याबद्दल धाक निर्माण होतो, तर सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट होतो.सपोनि.मयुर भामरे सह
पोहेकॉ रतन मोरे यांच्या टिमने उल्लेखनीय कार्याची दखल घेत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला. यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन व्यक्त करत भविष्यातही अशीच निष्ठावान सेवा जनतेसाठी आणि देशासाठी घडत राहो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. सपोनि.मयुर भामरे व
रतन मोरे व टिमची ही कामगिरी संपूर्ण धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. पोलीस दलातील एका सामान्य कर्मचाऱ्याने आपल्या जिद्द, मेहनत आणि कर्तव्यभावनेच्या जोरावर असामान्य यश संपादन केल्याने अनेक तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.
आज त्यांच्या या यशस्वी कामगिरीला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त दाद मिळत असून, “कर्तव्य हेच धर्म” या भावनेने काम करणाऱ्या या कर्तव्यदक्ष पोलीस जवानाला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:54 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!