DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साकिब सैय्यद
पिंपळनेर: आगामी बकरा ईद (ईद-उल-अजहा) सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेचे वातावरण टिकून राहावे, यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च (संचलन) काढण्यात आला. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्य मार्गांवरून संचलनहा रूट मार्च पिंपळनेर पोलीस स्टेशनपासून सुरू झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख चौक, इंदिरानगर, रामनगर, संवेदनशील परिसर आणि बाजारपेठेच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आला. रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवान मोठ्या संख्येने सामील झाले होते. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया Facebook, WhatsApp वर येणाऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अशा गोष्टी पुढे फॉरवर्ड करू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



