🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- कामाच्या पैशांवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाने परिचिताच्या भावाच्या नावावर असलेली इलेक्ट्रिक मोपेड पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना राजाराम चौक परिसरातील टिबरू मार्केट येथे घडली. या घटनेत सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या मोपेडचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी कृष्णा मुरली बिंद (वय २४, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. टिबरू मार्केट, कोल्हापूर) आणि आरोपी अजय उर्फ उपेंद्र लुगन यादव (वय ४०, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी अजय यादव आणि त्याचा मित्र राजेश महतो यांच्यात कामाच्या पैशांवरून वाद झाला होता. हा वाद फिर्यादी कृष्णा बिंद यांनी मध्यस्थी करून मिटवला होता.
मात्र याच प्रकाराचा राग मनात धरून आरोपी अजय यादव याने दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या भावाच्या नावावर असलेल्या राखाडी रंगाच्या TVS iQube इलेक्ट्रिक मोपेड (एमएच ०९ जीडब्ल्यू ८७४७) वर प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल ओतून ती पेटवून दिल्याचा आरोप आहे.
या आगीमध्ये मोपेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी कृष्णा बिंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४०३/२०२६, बी.एन.एस. कलम ३२६(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



