DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार
कुपवाड : हनुमाननगर परिसरात बुधवारी रात्री थरारक घडामोड उघडकीस आली. नंबर प्लेट नसलेल्या संशयित इनोव्हा कारला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता चालकाने भरधाव वेगात वाहन पुढे नेत थेट पोलिसांच्या गाडीला धडक दिली. मात्र कुपवाड पोलिसांनी चित्रपटातील पाठलागाप्रमाणे कारचा पाठलाग करत अखेर वाहन अडवण्यात यश मिळवले.
पोलिसांनी इनोव्हा कारची झाडाझडती घेतली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे २०० किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून जप्त केलेल्या गांजाचे मोजमाप व पंचनामा सुरू आहे. दरम्यान, या धाडसी कारवाईत कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणामागे मोठे गांजा तस्करी रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



