नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ब्रम्हांड कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी :- इचलकरंजी येथील गणेशनगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ब्रह्माई कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य

शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब ,शुगर तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी नंतर मोफत औषध वितरण करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.“आपले आरोग्य, आपली जबाबदारी” संदेशासह आयोजित या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“ब्रह्मांड कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ” मार्फत मोफत आरोग्य शिबिराच्या उपक्रमातून समाजाच्या आरोग्याची काळजी घेत एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले. “एक पाऊल समाजासाठी” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी
मंडळाचे अध्यक्ष सुभाष मधाळे,
सचिव राजू आप्पांगोल,
खजिनदार महेश भिंगवडे यांच्या सह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 pm, September 20, 2026
28°C
छितरे हुए बादल
69 %
7 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 49%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!