नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भल्या पहाटे गोळ्यांचा आवाज अन् शिरूर हादरलं; आंबेडकर नगरमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले

शिरूर (पुणे) : शुक्रवारची सकाळ उजाडत असतानाच शिरूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली. लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी सुमारे साडेसहा वाजता एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पहाटेच्या शांततेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत तपास सुरू करण्यात आला आहे.
हल्लेखोर कोण होते? तरुणावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण काय? हा पूर्ववैमनस्यातून झालेला हल्ला होता की त्यामागे दुसरे कारण आहे? या बाबींचा उलगडा पोलीस तपासातून होणे अपेक्षित आहे.
भरवस्तीत आणि सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे शिरूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आरोपींचा शोध आणि हत्येमागील कारण स्पष्ट करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:25 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
41 %
6 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 34%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!