नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मूर्तिजापुर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न. 

(आ. पिपळे यांच्या हस्ते उद्धाटन; शेकडो नागरिकांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ)

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे 

अकोला:- मुर्तिजापूर येथे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक तक्रारीचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण करण्यासाठी तसेच डिजिटल सातबारा आठ अ उतारा आणि सिंगल डे सर्विस डिलिव्हरी प्रणालीच्या प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने शेतकरी व नागरिकांच्या समस्या निकाली लावण्यासाठी मुर्तीजापुर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मुर्तीजापुर चे लाडके माननीय आमदार हरीष भाऊ पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास शेकडो लोकांनी उपस्थिती दर्शवली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महसूल विभागासह इतर सर्वच प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित समस्या व अडचडणींचे निराकरण एकाच छताखाली करण्यात आले होते.

विभागांच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते.

यासोबतच, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या विविध महिला बचत गटांचे स्टॉल्स या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

महिलांनी स्वकष्टाने बनवलेले विविध खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, वूलनच्या रांगोळ्या, कापड व चिक्की यांसारखी अनेक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.

या स्टॉल्सना नागरिकांनी उत्स्फू्र्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांची सर्व शासकीय विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रकरणांवर अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केली.

आमदार हरिष पिंपळे यांनी आपल्या भाषणातून तालुक्यातील समस्यां मांडून त्याचे निवारण केले तसेच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे होणारे नुकसान यावर दुःख व्यक्त केले.

या शिबिराला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली व त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्धाटन केले.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहन शासकीय योजनांचा लाभ घेतला.शिबिराला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्या भेटीचा योग जुळून आला.

यावेळी मंचावर उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप अपार मुर्तिजापूर, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय अधिकारी डॉ मिलिंद जगदाळे बार्शीटाकळी, तहसीलदार रवींद्र कापशीकर बार्शीटाकळी, मुर्तिजापूरचे नगराध्यक्ष हर्षल साबळे, पोलिस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार धरमेंद्र जोशी, ठाणेदार नावकर, सर्व कृषी अधिकारी तसेच दीपक तायडे,संदीप जळमकर, इब्राहिम घाणीवाला, राहुल पाटील, उपस्थित होते प्रास्ताविक करताना खंडारे यांनी केले तर बहारदार सुत्रसंचलन अकोला आकाशवाणीचे निवेदक विकास पल्हाडे यांनी केले .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:27 am, August 4, 2026
25°C
घनघोर बादल
83 %
7 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:05 am
Sunset: 7:08 pm
Translate »
error: Content is protected !!