नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहापूरात धक्कादायक प्रकार! तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे

इचलकरंजी शहापूर (ता. हातकणंगले,जि. कोल्हापूर): शहापूर परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. बहिणीच्या शोधाच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिर परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी अर्जुन प्रकाश गोसावी (वय २७ रा.साई नगर, राधानगरी जि. कोल्हापूर ) यांना आरोपी अनिल जयसिंग गोसावी व सुरेश जयसिंग गोसावी (रा. कागल जि. कोल्हापूर ) याने कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले.
या हल्ल्यामागे फिर्यादीच्या बहिणीच्या शोधाचा वाद असल्याचे समोर आले आहे. फिर्यादीची बहीण हरवल्यामुळे तो तिचा शोध घेत असताना आरोपीसोबत वाद झाला. या वादातून आरोपीने “शोध घेतलास तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत हल्ला केल्याची माहिती आहे.
जखमी तरुणावर उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ११८(१) ,३५२, ३५१(२), (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हे. कॉ.पाटील करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 pm, September 20, 2026
28°C
छितरे हुए बादल
69 %
7 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 49%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!