नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी नंदुरबार एलसीबीच्या ताब्यात

पाच चोरीच्या गुन्ह्यांची उकल; ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी जयकुमार चित्ते 

नंदुरबार – शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी, वायर व शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून ८५ हजार ९०० रुपये किमतीच्या पाच इलेक्ट्रीक मोटारी व वायर हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेती साहित्य चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

 

नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य तसेच पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान, १४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करीत गणेश आप्पा भिल (३०), सोमा गोमा भिल (२८), बादल मनोज भिल (२१) आणि समाधान रविंद्र भिल (२०), सर्व रा. खोकराळे, ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून पाच इलेक्ट्रीक मोटारी व वायर असा एकूण ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक ४६६/२०२५, ४६७/२०२५, ४६८/२०२५, ४६९/२०२५ व अदखलपात्र गुन्हा क्रमांक २७८/२०२५ अशा एकूण पाच शेती साहित्य चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ तसेच पोलीस हवालदार दिनेश चित्ते, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार आणि पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, यशोदिप ओगले, राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:25 pm, September 20, 2026
34°C
छितरे हुए बादल
41 %
6 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 34%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!