नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संविधान परिवारातर्फे गरजू व एकल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी निवास गागडे 

इचलकरंजी : स्वातंत्र्यसैनिक साथी वासू देशपांडे जन्मशताब्दी अभियान २०२६ अंतर्गत संविधान परिवारातर्फे गरजू व एकल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांसह आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजीच्या पर्यवेक्षिका सौ. आर. एस. पाटील या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संविधान परिवाराचे साथी संजय रेंदाळकर व साथी दादासो तराळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा व बळ मिळते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

या प्रसंगी श्री. पी. एस. कोळेकर, श्री. एम. जी. आंबेकर, सौ. व्ही. टी. खेडकर, सौ. एन. सी. नांद्रे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:55 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!