नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्वतंत्र भील राज्याची निर्मिती करा; भारत आदिवासीं पक्षाची प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी.

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – अकिल शहा 

साक्री: महाराष्ट्र(धुळे,जळगाव, नंदुरबार,)गुजरात, मध्यप्रदेश,राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेश दादर हवेली या भागातील सीमेवर असलेल्या ३९ ते ४९ जिल्ह्यांचा समावेश करून “स्वतंत्र भील राज्य” म्हणून मान्यता द्यावी या मागणीचे निवेदन भारत आदिवासीं पक्ष व स्थानिक आदिवासी च्या वतीने दि.१५ जुलै बुधवारी रोजी साक्री तहसील कार्यालामार्फत प्रशासनास देण्यात आले या निवेदनात विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत की,भारतातील भील आदिवासी समुदायासाठी प्रस्तावित असलेला एक नवीन वेगळा राज्य प्रदेश आहे.मुख्य माहितीप्रस्तावित प्रदेश यात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील आदिवासी बहुल जिल्ह्यांचा समावेश आहे.मागणीचे कारण भील संस्कृती, भाषा (भीली) आणि परंपरांचे जतन करणे हा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्यानंतर भील सांस्कृतिक क्षेत्र चार राज्यांमध्ये विभागला गेला आजच्या घडीला भील समाजाव्यतिरिक्त आदिवासी समाजाचा आवाज सरकार ऐकत नाही सरकार आदिवासींचा आवाज दाबत आहे, आदिवासींना न्याय मिळावा , ९ ऑगस्ट आदिवासी दिवस “राष्ट्रीय अवकाश दिवस”म्हणून घोषित करावा , वन नेशन वन पॉलिसी लागू करावी, सैन्यात राजपूत रेजिमेंट सारखी भील रेजिमेंटची निर्मिती करावी अशा विविध मागण्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

या निवेदनावर लखन पवार, भरत गायकवाड ,गोरख पवार, सोमनाथ माळचे, प्रल्हाद पवार, बाळा सोनवणे, श्रावण वाघ, सोमनाथ भवरे, विशाल पवार, अजय अहिरे,अर्जुन पवार, हेमंत माळीच,करण फुलपगारे, नंदू सोनवणे,ज्ञानेश्वर माळीच, योगेश ठाकरे, अण्णाभाऊ माळचे, बहीरम सोनवणे, बापू मोरे, प्रवीण सोनवणे,दादाजी माळचे, देविदास ठाकरे, भिलाजी माळचे,अमृत मोरे आदींच्या सह्या आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!