नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहापूर रोडवर दारूच्या नशेत महिला रस्त्याच्या मध्यभागी पडली; मुस्लिम दांपत्याने दाखवली माणुसकी

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर:-  ता. हातकणंगले इचलकरंजी शहरातील शहापूर रोडवरील आवळे मैदानासमोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडली. एका अज्ञात महिलेने दारूच्या नशेत रस्त्याच्या मध्यभागीच पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. भरधाव वाहने ये-जा करत असताना ही महिला रस्त्याच्या मधोमध पडलेली असल्याने वाहनचालकांना अचानक वाहने थांबवावी लागली. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी महिलेला काय झाले आहे, याची विचारपूस केली असता तेथील स्थानिक महिलांनी संबंधित महिला दारूच्या अतिनशेत असल्याचे सांगितले. त्यामुळे ती स्वतः उठण्याच्या स्थितीत नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.

याचवेळी शहापूर रोडवरून प्रवास करणाऱ्या एका मुस्लिम दांपत्याने कोणतीही तमा न बाळगता त्या महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या महिलेला सुरक्षितपणे बाजूला नेले. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला.

घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित होते. मात्र अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत त्या मुस्लिम दांपत्याने दाखवलेली माणुसकी आणि सामाजिक जबाबदारी उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली.

या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणे हीच खरी माणुसकी असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:15 am, July 19, 2026
27°C
घनघोर बादल
66 %
9 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!