नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे म.न.पा. तील आरोग्य विभागातील मुकडदम सात हजार लाच घेतांना रंगेहात अटक

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे : धुळे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकडदम रविंद्र शामराव धुमाळ (वय ५०, रा. भटाईमाता रिक्षा स्टॉपजवळ, मोहाडी उपनगर, धुळे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या पथकाने गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) लाचेसह रंगेहात पकडले.
तक्रारदार हे महापालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी घेऊन ती स्वच्छता निरीक्षकांकडे पाठविण्याची जबाबदारी आरोपी मुकडदम रविंद्र धुमाळ यांच्यावर होती. या हजेरीवरून सफाई कर्मचाऱ्यांचा पगार तयार होतो. याच पद्धतीने तक्रारदार यांचा ऑगस्ट २०२५ पर्यंतचा पगार अदा करण्यात आला होता.
मात्र पुढील पगारासाठी त्यांची हजेरी लावण्यासाठी आरोपी धुमाळ यांनी तक्रारदाराकडे ८ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ७ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोपीने मागणीची पुष्टी केली.
यासंदर्भात सापळा रचण्यात आला असता, गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) आरोपी धुमाळ यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र. २९८/२०२५, भा.प्र. कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व पथक
सापळा पर्यवेक्षण: सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
सापळा अधिकारी: यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक
सापळा पथक: पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक, पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर.
मार्गदर्शन:
१) मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक
२) मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक
३) मा. श्री. सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र
लाचलुचपत विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय / निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी पंटर यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:31 am, September 21, 2026
27°C
साफ आकाश
72 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 2%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!