नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्था. गु. अ. शाखा, सांगली यांची मोठी कारवाई ; गांजा विक्री करणारे २ आरोपी जेरबंद.

७ किलो १७५ ग्रॅम वजनाचा ३,१५,२५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : रमजान मुलानी

सांगली :- मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी, विक्री व वितरण करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व त्यांच्या पथकाने कारवाई केली. दिनांक ०३/०२/२०२६ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, हद्दपार आरोपी हुसेन बादशाहा सय्यद व त्याचा मेव्हणा सोहेल पठाण हे दोघे गांजा विक्रीसाठी मोटारसायकलवरून म्हैशाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींची नावे सोहेल लालुखान पठाण, वय २० वर्षे हुसेन बादशाहा सय्यद, वय २७ वर्षे दोघेही रा. कैकाडी गल्ली, मिरज अशी असल्याचे निष्पन्न झाले.
पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, सोहेल पठाणच्या ताब्यातील प्लास्टिक पोत्यात ७ किलो १७५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. सदर गांजाची अंदाजे किंमत ३,१५,२५०/- रुपये इतकी असून, तो जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपींकडून गांजा व मोटारसायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून, पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!