नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधीक्षकाला २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूरामध्ये रंगपंचमी सणाच्या निमित्ताने रंग विक्रीसाठी लावलेल्या स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.या प्रकरणातील आरोपी लोकसेवक विलास शामराव साळोखे (वय ५५) हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदाराने रंगपंचमी सणाच्या काळात रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अतिक्रमण असल्याचे सांगून त्यावर कारवाई करण्याची भीती दाखवत साळोखे यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला १५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे १० मार्च २०२६ रोजी प्राप्त झाली.
तक्रारीनंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी साळोखे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी २००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराने दिलेली २००० रुपयांची लाच साळोखे यांनी पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाच रक्कम त्यांनी आपल्या मोटारसायकलवरील पिशवीत ठेवली होती. त्यानंतर आरोपीची अंगझडती घेऊन मोटारसायकल व त्यावरील पिशवी पंचनाम्याने जप्त करण्यात आली.
आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी आरोपी विलास साळोखे यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस १० मार्च २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, हवालदार सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार व प्रशांत दावणे यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:17 am, November 5, 2026
24°C
साफ आकाश
60 %
9 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!