DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी निवास गागडे
कोल्हापूर :- इचलकरंजीच्या वतीने पवित्र रमजान ईद च्या निमित्ताने ईदगाह मैदान इचलकरंजी येथे नमाज पठनानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प व थंड उसाचा रस देऊन शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नेहमीच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांच्या कडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 2000 पेक्षा अधिक लोकांनी शुभेच्छा केंद्राला भेट दिली शुभेच्छा स्वीकारल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख , इस्माईल समडोळे, अमीर मुल्ला, धनाजी डोईफोडे गणेश जाधव, मुन्ना समडोळे, अतिक समडोळे, सिकंदर मुल्ला आदी मान्यवर आणि विशेष परिश्रम घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तौफिक मुजावर, निहाल कलावंत, हाजी गफ्फार समडोळे, श्री बजरंग लोणारी, अमर देशमुख, आमिर मुल्ला, धनाजी डोईफोडे, गणेश जाधव, सौरभ भेंडे,राहुल कांबळे , सागर कोळी, निवास गागडे , अमित पाडळे, अमित ठाणेकर , आबासाहेब वास्ते, बबलू मोरे, विनोद कल्ले, नूरमहंमद कलावंत ,निहाल कलावंत, याशिन मुजावर, तौफीक नदाब, संदीप शिंदे, शिकंदर मुल्ला, इस्माईल समडोळे, मोहम्मद इलियास समडोळे, गफ्फार समडोळे, रेहान समडोळे, कैसर समडोळे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, आदी मान्यवर यांनी शुभेच्छा केंद्रांला भेट दिली.



