नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सुरुते मराठी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव

महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त कुमार विद्यामंदिर सुरुते शाळेत विद्यार्थ्याना सतीश माळगे RPI जिल्हा सचिव कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष चंदगड भरमु शिंदे, रवींद्र कांबळे, शाखा प्रमुख गजानन कांबळे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना वह्या व पेन साहित्य वाटप करण्यात आले.
पत्रकार व चंदगड तालुका RPI अध्यक्ष भरमु शिंदे यांनी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आचरणात आणून शिका! संघटित व्हा! आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सांगून शिक्षण हॆ वाघिणीचे दूध असून जो पितो तो गुरगुरतो असे मौलिक विचार मांडले. त्याचबरोबर जयंती साजरी करत असताना जयंती नाचून नाही तर बाबासाहेबांचे विचार वाचून साजरी केली पाहिजेत असे सांगितले. त्याचप्रमाणे उपस्थित रमेश नाईक,तानाजी नाईक यांनीही बाबासाहेबांचे विचार व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसमोर मांडले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भरमु गावडे , रामणकट्टी,अध्यापक तानाजी नाईक, रमेश नाईक, रेणुका सुतार उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 pm, September 20, 2026
28°C
छितरे हुए बादल
69 %
7 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 49%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!