DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत घरफोडीच्या गुन्ह्यातील सरा
ईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण सुमारे १५.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१२ एप्रिल 2026 रोजी घडलेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी अविनाश गंगाधर सुतार (वय २८ रा. नागाळ पार्क,कोल्हापूर) रजत रामचंद्र खिलारे (वय ३० रा.नागाळ पार्क , कोल्हापूर )याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ९४.८२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल एक्टिवा मोपेड MH 09 FF 7616 असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चौकशीत आरोपीने आणखी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्यावर ३ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे परिसरातील घरफोड्यांच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सह. पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अंमलदार राजू कोरे, हिंदुराव केसरे, गजानन गुरव, महेश कोरवी, विजय इंगळे, संजय देसाई, सुशिल पाटील,अमित मर्दाने यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



