नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कामगार दिनानिमित्त असंघटित बांधकाम कामगारांना साहित्य, भांडी वाटप- अध्यक्ष विकी माने

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

इचलकरंजी – हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे १ मे कामगार दिनानिमित्ताने असंघटित बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कामगारांना उपयुक्त असे विविध साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे विद्या चौगुले यांच्या हस्ते कामगारांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तूंसह सुरक्षितता व कामाशी संबंधित साहित्याचा समावेश होता. यामुळे कामगारांच्या कामकाजात सुलभता येणार असून त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होण्यास मदत होणार आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच महिला व बांधकाम कामगारांची उपस्थिती लक्षणीय होती. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबविण्याची मागणी केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील काळातही अशा कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विकी माने यांनी सांगितले. यावेळी तेजस्वीनी पाटील,रमेश कांबळे,
संतोष कांबळे, सुभाष घुनके, यांच्यासह असंख्य कामगार उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:34 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!