नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई; विचारेमाळ परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांना अटक !

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संजय दिंडे कोल्हापूर

शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या विचारेमाळ येथील ‘शिख गल्ली’ परिसरात पोलिसांनी आज (१६ मे) मध्यरात्रीच्या सुमारास एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ११ जणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भाड्याच्या घरात सुरू होता ‘तीन पानी’ जुगार
मिळालेल्या माहितीनुसार, विचारेमाळ येथील शिख गल्लीत राहणारा संशयित आरोपी उमर उर्फ बंडा अय्याज फकीर याने स्वतःच्या भाड्याच्या घरात बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू केला होता. या ठिकाणी कोल्हापूर शहर व परिसरातील अनेक लोक एकत्र येऊन ‘तीन पानी’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी १६ मे रोजी मध्यरात्री १२:०५ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला.

११ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या व खेळाला जागा उपलब्ध करून देणाऱ्या खालील ११ जणांना ताब्यात घेतले आहे:
१) नियाज दावन इनामदार (वय ३६, रा. साळुंखेनगर)
२) सागर मारुती कागले (वय २९, रा. सदर बाजार)
३) पोपट वसंत हेगडे (वय ४२, रा. कसबा बावडा)
४) उमर उर्फ बंडा अय्याज फकीर (वय ३२, रा. विचारेमाळ) – जागा मालक/चालक
५) अमित दिलीप वडणकर (वय ४५, रा. शाहू मार्केट यार्ड)
६) महेश रामचंद्र लोखंडे (वय ४५, रा. गडमुडशिंगी)
७) मुनाफ आयुब बागवान (वय २७, रा. बिंदु चौक)
८) मंगेश चंद्रकांत पाटील (वय ३८, रा. मांगरवाडा)
९) संदीप मारुती वायदंडे (वय ३९, रा. कनाननगर)
१०) राजेंद्र सदाशिव निकम (वय ६४, रा. शिवाजी पेठ)
११) सोहेल असलम शेख (वय २३, रा. राजारामपुरी)
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

या यशस्वी कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
रोख रक्कम: ६१,२००/- रुपये

मोबाईल हँडसेट: वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ८४,०००/- रुपये किमतीचे मोबाईल
एकूण मुद्देमाल: १,४५,२००/- रुपये
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेश सदानंद पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सिंघम पथकाने केली कारवाई:

ही धडक कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे (दाखल करणारे), पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव (तपासी अंमलदार).
अंमलदार: महेश पाटील (फिर्यादी), सुशील गायकवाड, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे, प्रशांत आवळे, सुशील सावंत, सुरज आबिटकर, अरुण कारंडे आणि युवराज सूर्यवंशी.
शहरातील अवैध धंद्यांवर शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई आकाश जाधव करत आहेत

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:42 am, May 17, 2026
38°C
साफ आकाश
23 %
23 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 2%
Visibility: 10 km
Sunrise: 5:52 am
Sunset: 7:01 pm
Translate »
error: Content is protected !!