नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

६० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन कोळी / नारायण कांबळे

कोल्हापूर:- कोर्ट हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ६० हजार रुपये स्विकारताना मंडळ अधिकारी व त्याचा खासगी साथीदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर घटकाने रविवारी (दि. १८ मे) रोजी शिरोळ तालुक्यात ही यशस्वी सापळा कारवाई केली. या कारवाईत आरोपी म्हणून मंडळ अधिकारी अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय ४४), मंडळ अधिकारी, नृसिंहवाडी, अतिरिक्त कार्यभार नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर तसेच खासगी व्यक्ती शिवाजी आनंदराव जाधव (वय ६१), रा. जाधव मळा, धरणगुत्ती, ता. शिरोळ यांना ताब्यात घेण्यात आले.तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रारीत कोर्टाच्या आदेशानुसार सातबारावर नाव नोंद करण्यासाठी आरोपींकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती ६० हजार रुपये देण्याचे ठरले.मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर यांनी तक्रारदारास ६० हजार रुपये खासगी व्यक्ती शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांनाही लाच रकमेसह रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:35 pm, September 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
65 %
12 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 73%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!