नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वडगांव पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅव्हल्स बसमधील १६४ ग्रॅम सोन्याची चोरी उघड

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी-‌ नारायण कांबळे

कोल्हापूर : प्रवासी बसमधून प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला वडगांव पोलिसांनी अटक करत तब्बल २८ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे बस प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
वडगांव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. एक्सप्रेस बसमधून चोरी करणारा आरोपी कमरुद्दीन बाबा खान ( वय ३९ रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून १६४ ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि अन्य साहित्य असा एकूण २८ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे बसमधील चोरीच्या घटनांना आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग अमोल ठाकुर, यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव पोलिस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील ‌आसिफ कलायगार, महेश गायकवाड,प्रकाश कांबळे, शरद मेनकर, विजय जाधव, आबा गुंडणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत, शेखर कदम यांनी केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:41 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
62 %
11 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 80%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!