कनिष्ठ अभियंता सावंत यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी.
DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री: शेवाळी(दा.) ता.साक्री येथील संतप्त शेतकऱ्यांनी दि.२८/०५/२०२६ गुरूवारी शेवाळीतील विज वितरण कंपनीला कुलुप ठोकून आपला राग व्यक्त केला. शेवाळी येथील ४ न.ट्रांन्सफार्मर(डि.पी.) गेल्या सात(७) दिवसापासून बंद आहे या विषयी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे शेवाळी उप केंद्रातील उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता विवेक सावंत यांना संपर्क साधून तातडीने डीपी बसवून देण्याची मागणी केली परंतु या मागणीकडे मुजोर कनिष्ठ अभियंता विवेक सावंत यांनी दुर्लक्ष केल्याने शेतात कपाशी पिकाचे लागवडीचे काम सुरू असतांना शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कनिष्ठ अभियंता विवेक सांवत यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष उफाळून आल्याने शेवटी संयमाचा बांध तुटल्याचे त्यांनी गावातील विज वितरण उप केंद्राला धडक दिली व कार्यालयाला ताळे ठोकले.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता सावंत वारंवार कार्यालयात गैरहजर राहत असल्याची ही तक्रार करण्यात आली व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल साक्री येथील विज वितरण कंपनीचे उप अभियंता गणेश जाधव यांनी घेतली त्यांनी दीपक साळुंके यांच्याशी तात्काळ मोबाईल द्वारे संपर्क साधून आश्वासन दिले कि, दोन तासात ट्रान्सफॉर्मर बसवण्याची व्यवस्था करतो तो पर्यंत आंदोलन थांबवावे अशी विनंती केली या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सावंत यांच्यावर तात्काळ कारवाई कऱण्यात यावी करावी अशी मागणी कऱण्यात आली अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला. या वेळी शेवाळी, देवनगर येथील शेतकरी दिपक साळुंके, डॉ.विजय साळुंके, संजय साळुंके, संदिप साळुंके, अनिल साळुंके, प्रशांत भामरे, सतिष साळुंके, सोनु भास्कर, भाऊलाल सोनु, भगवान मारनर,भटु चिंधा, सुरेश मारनर, संतोष भास्कर,शंकर भटु, हीरामन, सखाराम मारनर आदी शेतकरी उपस्थित होते.



