नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोलोलीतील खूनप्रकरणाची उकल, अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून महिलेची हत्या, आरोपी जेरबंद.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी-‌ नारायण कांबळे

कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या निर्घृण खूनप्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्याने आरोपीने धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान कोलोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील मासुलकी नावाच्या शेतात छबुताई सर्जेराव पाटील (वय ५५) या काम करत असताना अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार करून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी बाबासो श्रीपती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तांत्रिक, परिस्थितीजन्य पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान अंकुश हणमंत पाटील (वय ५१, रा. कोलोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) याच्यावर संशय निर्माण झाला. त्यास २६ मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
मयत छबुताई पाटील यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केल्याने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार करून हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपीस पुढील तपासासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, लक्ष्मण सरगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:11 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!