नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; नवजात अर्भक प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत उलगडा

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार

सांगली — मिरज येथील प्रसूती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या अपरीपक्व नवजात अर्भक प्रकरणाचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मिरज शहरात मोठी खळबळ उडाली होती.
दिनांक २८ मे २०२६ रोजी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रसूती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. या प्रकरणी सफाई कर्मचारी विजय ईराण्णा पोतराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून मिरज शहर पोलिसांनी तात्काळ विविध तपास पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रुग्णालयातील कर्मचारी, नर्स आणि संबंधित व्यक्तींकडे कसून चौकशी सुरू असताना एका नर्सने उपचारासाठी येणाऱ्या एका गर्भवती महिलेबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी तत्काळ संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले.
महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशीदरम्यान संबंधित महिलेने धक्कादायक माहिती दिली. २४ मे रोजी रात्रीपासून पोटदुखी सुरू झाल्याने ती २५ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात आली होती. मात्र, उपचारापूर्वीच ती टॉयलेटमध्ये गेली असता गर्भपात होऊन अपरीपक्व नवजात अर्भक खाली पडल्याचे तिने सांगितले. रक्तस्त्राव आणि भीतीमुळे घाबरलेल्या महिलेने टॉयलेट साफ करून कोणालाही काहीही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याची कबुली दिली.
महिलेच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने मेहनत घेतली.या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा, गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि वैद्यकीय यंत्रणेतील सतर्कतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:03 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!