DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी निवास गागडे
इचलकरंजी येथील आरगे भवनमध्ये चि. सौ. का. श्रुती गागडे व चि. विवेक गुमाने यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात, आनंदमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छांचा वर्षाव केला.
विवाहपूर्व कार्यक्रमांतर्गत दिनांक 27 मे 2026 रोजी रात्री भव्य मेहंदी समारंभ व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्युनिअर इमरान हाश्मी व ज्युनिअर गोविंदा यांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या दमदार नृत्याविष्कारामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर दिनांक 28 मे 2026 रोजी चि. सौ. का. श्रुती गागडे व चि. विवेक गुमाने यांचा शुभविवाह सोहळा विधिवत संपन्न झाला. या विवाह समारंभास असंख्य नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवविवाहित दाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन धनाजी डोईफोडे, व्हाईस चेअरमन गणेश जाधव, संचालक विष्णुपंत नेतले,धोंडीराम मांगलेकर,रोहित रजपुते,अमित ठाणेकर, अमित पाडळे, राजेश लाहोटी, प्रकाश सारडा, सुरज नेतले, वन्दना नेतले,प्रशांत कांबळे, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या सुकाणू समितीचे अरुण खोत, वैशाली खोत, आरती खोत तसेच मधुसूदन पडियार व पुष्पा पडियार यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याची भेट घेत त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
संपूर्ण विवाह सोहळा आनंद, उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. विवाह सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत नवदाम्पत्याच्या सुखी, समृद्ध व मंगलमय वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



