नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार 

मिरज:- मिरज तालुक्यातील पायापाचीवाडी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असतानाच तिचा विवाह पायापाचीवाडी येथे लावून देण्यात आला होता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी वैशाली ब्रह्मानंद गाडे यांनी तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार पती धनंजय जगन्नाथ कोचटी, जगन्नाथ लक्ष्मण कोचटी, संगीता जगन्नाथ कोचटी (सर्व रा. पायापाचीवाडी, ता. मिरज) तसेच सुरेश बसाप्पा अजुरे व गौरी सुरेश अजुरे (दोघे रा. तारदाळ समर्थनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:40 am, November 5, 2026
26°C
टूटे हुए बादल
53 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 76%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!