नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड, ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड : नांदेड जिल्हा पोलिसांनी जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत सात आरोपींना ताब्यात घेतले असून एकूण ५ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भाग्यनगर व रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

⭐भाग्यनगर पोलीस ठाण्याची कारवाई

भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.न. ३१८/२०२६ कलम ३०९(६), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी विजय महादेव पडोळे (रा. तरोडा नाका, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जून २०२६ रोजी मालेगाव रोडवर काही अज्ञात आरोपींनी त्यांच्या स्कुटीसमोर वाहन आडवे लावून स्कुटी जबरदस्तीने हिसकावून नेली होती.
तपासादरम्यान स्वयंवर मंगल कार्यालय परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली स्कुटी व एक स्विफ्ट कार असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आकाश आनंदराव साखरे, विजय भगवानराव वानखेडे, माधव आनंदराव नंदनकर, प्रतिक बालाजी ससाने तसेच एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे.

⭐रामतीर्थ पोलीस ठाण्याची कारवाई

रामतीर्थ पोलीस ठाण्यात गु.र.न. १२२/२०२६ कलम ३०९(४), १२६(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ११ जून २०२६ रोजी बिलोली-नर्सी मार्गावर मोटारसायकलवरून जात असताना दोन अज्ञात आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून धाक दाखवत ओप्पो कंपनीचा मोबाईल व २,५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद अरफत सय्यद हुसेन व शेख अरबाज शेख अजीज यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल व एक खंजर असा १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने आणि श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्यासह भाग्यनगर व रामतीर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!