नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली जिल्हा पोलीस दलात ३२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; सात जणांना मुदतवाढ, संजयनगर ठाण्याचे मनुष्यबळ वाढले

DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- रमजान मुलानी 

सांगली :- सांगली जिल्हा पोलीस दलातील ३२ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यासंदर्भातील प्रशासकीय आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ नव्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या आदेशानुसार वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील तसेच उपनिरीक्षक योगेश शेलार, समाधान धुगे, निवास मोरे, नितीन बाबर आणि कुमार पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये निरीक्षक अजय सिंदकर, संतोष पवार, सहाय्यक निरीक्षक रणजित टिपे, सुनील गिड्डे, विमावरी रेळेकर, विक्रांत संकपाळ, तबस्सुम मगदूम आणि किशोरकुमार खाडे यांचा समावेश आहे. तसेच उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पूजा येळेकर, राजू केंदे, पांडुरंग मुंडे, सुजाता भोपळे, जीवन कांबळे, संतोष यादव, बाबासाहेब बदने, विश्वंभर पोटे, वैभव पाटील, प्रियंका माने, प्रणोती यादव, संग्राम पाटील, विठ्ठल मणिकेरी आणि एकनाथ पाटील यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, संजयनगर पोलीस ठाण्यावरील वाढता कामाचा ताण लक्षात घेऊन तेथील मनुष्यबळ वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:54 pm, September 20, 2026
30°C
टूटे हुए बादल
57 %
10 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 79%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!