🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे भामटे (कोल्हापूर)
कोल्हापूर:- शाहुपूरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्याविरुद्ध लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होता. तक्रारदार अटकेत असताना तपासात तसेच जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात जाधव यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराच्या वडिलांकडून २५ हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे.तक्रारदार जामिनावर सुटल्यानंतर उर्वरित रकमेची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. एसीबीने केलेल्या पडताळणीत पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे तसेच स्वतःसाठी आणखी २५ हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी अपर्णा सुखदेव जाधव (मूळ रा. हातनोळी, ता. तासगाव, जि. सांगली; सध्या रा. कळंबा, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई वैष्णवी पाटील,पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, पोलीस हवालदार संगीता गावडे, सचिन पाटील, पोलीस नाईक संदीप पवार व इतर पथकाने कारवाई पार पाडली.



