नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हलकर्णी एमआयडीसीमध्ये बेकायदेशीर स्फोटक हाताळणी – चौघांवर गुन्हा दाखल 

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

कोल्हापूर :- हलकर्णी एमआयडीसी परिसरातील ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटलच्या बांधकामस्थळी स्फोटक पदार्थांचीबेकायदेशीर हाताळणी व स्फोट घडवून आणल्या प्रकरणी चंदगड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदगड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सुनील महेश सुतार (वय २८) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २३५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८०, २८८, ३(५) तसेच भारतीय स्फोटक कायदा कलम ९बी(१)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपींमध्ये अंकुश बापू पिस्टे (रा. कागल)शामलाल उदय जाट (रा.लिंगणूर-कापशी, ता. कागल), प्रसाद मनोहर बामणे (रा. गडहिंग्लज) आणि अक्षय जाधव (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हलकर्णी एमआय

डीसी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या बांधकामस्थळी

परवानगी शिवाय स्फोट

घडवून आणण्यात आला. तपासादरम्यान आरोपी क्रमांक १ याच्याकडे स्फोटक हाताळणीचा वैध परवाना नसतानाही आरोपी क्रमांक २ याने स्फोटक साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक २ याने स्फोटक वाहतूक परवान्याच्या अटींचा भंग करून सुमारे ५० किलो स्फोटक साहित्य व इतर साहित्य आरोपी क्रमांक १ कडे दिल्याचे निष्पन्न झाले आहे.याशिवाय आरोपी क्रमांक ३ याने स्फोट घडवून आणण्यासाठी मदत केल्याचा तर आरोपी क्रमांक ४ याने सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता खडक फोडण्याचे काम दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी “Super Power 90” असे मार्किंग असलेल्या प्रत्येकी १२५ ग्रॅम वजनाच्या २०० स्फोटक कांड्या, लाल रंगाची वायर तसेच वाहतुकी

साठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो (एमएच-१२

एलसी-००८८) जप्त केली आहे.याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राजीगरे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील स्फोटकांचा स्रोत, परवान्यांची वैधता तसेच संबंधित बांधकामातील जबाबदार व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:21 pm, July 18, 2026
28°C
घनघोर बादल
63 %
20 Km/h
Wind Gust: 30 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!