नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलवर धावून येणार मदत; ‘डायल 112’ चा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे आवाहन

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी परवेज शेख 

धाराशिव :- जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता तात्काळ ‘डायल 112’ या एकात्मिक आपत्कालीन सेवा क्रमांकाचा वापर करावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी केले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून संकटसमयी वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.

‘डायल 112’ कधी आणि का वापरावे?

पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्पष्ट केले की, खालीलपैकी कोणत्याही प्रसंगी विलंब न करता नागरिकांनी 112 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा:

गुन्हेगारी व अपघात: कोणताही गुन्हा घालत असताना किंवा रस्ते अपघाताच्या वेळी.

महिला व बालकांची सुरक्षा: महिला व बालकांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार किंवा सुरक्षेशी संबंधित घटना.

संशयास्पद बाबी: परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास.

इतर आणीबाणी: वैद्यकीय आणीबाणी (Medical Emergency) किंवा आग लागल्याच्या घटना घडल्यास.

महत्त्वाची टीप: ‘डायल 112’ वर माहिती मिळताच संबंधित आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देईल.

अचूक माहिती देण्याचे आवाहन

नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता पोलिसांना नेहमी अचूक व सत्य माहिती द्यावी, असेही पोलीस अधीक्षकांनी आवर्जून सांगितले. आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी व जलद करण्यासाठी ‘डायल 112’ या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

“आपली सुरक्षा… आमची जबाबदारी; आपत्कालीन प्रसंगी नक्की लक्षात ठेवा – डायल 112!”

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:01 pm, September 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
54 %
10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 64%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!