🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
कोल्हापूर:- बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरील शिनोळी बु. येथील आदर्श हॉटेलच्या पुढील बाजूस वीज बोर्डाच्या पाठीमागील माळावर उघड्यावर सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर चंदगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम व मटका जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण १ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विलास कल्लाप्पा पाटील (वय ३६, रा. शिनोळी खुर्द, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १,८५० रुपये रोख तसेच कल्याण मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या व एक बॉलपेन, असा एकूण १,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मारुती उन्हाळे यांनी फिर्याद दिली. आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाची कागदपत्रे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, चंदगड यांच्या न्यायालयात रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पुनाळकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हेड कॉन्स्टेबल चौगुले यांनी केली.



