🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – प्रा.अॅड. नागेंद्र जाधव
कोल्हापूर :- 15 ऑगस्ट हा दि
वस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.चंदगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभ वंदे मातरम गीताने होऊन चंदगड न्यायालयाच्या न्यायाधीश सो,श्रीमती आशाताई सरक, दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीसो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर जन गण मन या राष्ट्रगीताने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना करण्यात आली.
यावेळी चंदगड तालुका वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी, अध्यक्ष अॅड.व्ही. एन. पाटील, उपाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, सेक्रेटरी अॅड.जितेंद्र मुळीक, ग्रंथपाल अॅड.एम. जी. सुतार, खजानीस अॅड.व्ही. जी. झाजरी, महिला प्रतिनिधी अॅड.शिल्पा गावडे, कार्यकारी सदस्य अॅड.अपूर्वा कांबळे यांच्यासह चंदगड वकील बार असोसिएशन मधील वरिष्ठ विधीज्ञ, महिला विधीज्ञ, सर्व वकील वृंद, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देवून शुभेच्छा देण्यात आल्या. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि लढा देणाऱ्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



