🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी निवास गागडे
इचलकरंजी : महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन तथा धनाजी डोईफोडे युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी डोईफोडे यांचा वाढदिवस सोसायटीतील संचालक, पदाधिकारी, सभासद व मित्रमंडळींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनाजी डोईफोडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास नगरसेवक रवी रजपुते, राष्ट्रगीतचे संपादक आबा जाधव, राष्ट्रवादी नेते बाळासाहेब देशमुख तसेच उद्योगपती सरदार मुजावर भाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या औचित्याने ‘लाडाच्या गणपती’च्या यशाचा विशेष उल्लेख
धनाजी डोईफोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या लाडाच्या गणपती मंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष गौरव करण्यात आला. २०२४ मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत संपूर्ण इचलकरंजी शहरातून लाडाच्या गणपती मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिकेच्या वतीने मंडळाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी लाडाच्या गणपती मंडळाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. मात्र हे पारितोषिक अद्याप मंडळाला प्राप्त झालेले नाही. याबाबतची संबंधित फाईल नगरसेवक रवी राजपुते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, मंडळाला जाहीर झालेले पारितोषिक लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
लाडाच्या गणपतीच्या माध्यमातून केवळ गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि परिसरातील नागरिकांना एकत्र आणण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात धनाजी डोईफोडे यांचा कायमस्वरूपी पुढाकार व मार्गदर्शन राहिले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे मंडळाने इचलकरंजी शहरात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
सोसायटीच्या विकासकामांत धनाजी डोईफोडे यांचा पुढाकार
यावेळी नगरसेवक रवी रजपुते यांनी धनाजी डोईफोडे यांच्या सामाजिक, धार्मिक व सोसायटीच्या विकासातील कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, दरवर्षी भव्य स्वरूपात हनुमान जयंतीचे आयोजन व हजारो भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यात आले.
सोसायटीतील कोणत्याही सभासदाच्या अडीअडचणीच्या काळात तात्काळ मदतीला धावून जाणे, तसेच प्रत्येक घराला दररोज नियमित दोन तास पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.
सोसायटीच्या रिकाम्या जागेचा योग्य वापर करून सुंदर गाळे उभारण्यात आले असून त्यातून सोसायटीला दरमहा सुमारे ७० हजार रुपयांचे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. तसेच हनुमान जयंतीच्या दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेचा पारदर्शकपणे लेखाजोखा ठेवण्याची दक्षताही घेतली जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
धनाजी डोईफोडे यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेत भविष्यात ते निश्चितच नगरसेवक म्हणून पुढे येतील, असा विश्वास नगरसेवक रवी रजपुते व संपादक आबा जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी लाख-लाख शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीचे सुकाणू समिती सदस्य उद्योगपती अरुण खोत, दिलीप ढोकळे, व्हाईस चेअरमन गणेश जाधव, हिंदुराव जावळे,संतोष मांगलेकर, निवास गागडे, अमित ठाणेकर, शिवाजी पाटील, अमित पाडळे, प्रशांत वडर, धोंडीराम मांगलेकर, धोंडीराम वडर, दत्ता माणगावकर, बाबुराव भंडारे, विष्णुपंत नेतले, मधुसूदन पीडीयार, राजेश लाहोटी, अब्बास तेली, संकेत जाधव, सागर कोष्टी, सुनील वडर, सुनील उकिरडे, सुनील कुलकर्णी, सागर डांगरे, तुषार कांबळे, हर्षवर्धन वरुडे, सुजल गुरसाळे, योगेश कांबळे, काना शर्मा यांच्यासह सोसायटीचे संचालक, सभासद व परिसरातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, संचालक, सभासद व मित्रमंडळींनी एकत्रितपणे नाश्त्याचा आस्वाद घेतला. आनंदी व आपुलकीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व उपस्थितांनी धनाजी डोईफोडे यांना वाढदिवसानिमित्त भरभराटीच्या तसेच भावी सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



