नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हाजगोळी येथे जुन्या वादातून व्यापाऱ्यावर हल्ला नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – प्रा.नागेंद्र जाधव

कोल्हापूर :- जुन्या वादाच्या कारणातून एका व्यापाऱ्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व हातातील कड्याने मारहाण केल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हाजगोळी, ता. चंदगड येथे घडली. या प्रकरणी संजय बैजू गावडे (वय ५२, व्यवसाय व्यापार, रा. हाजगोळी, ता. चंदगड) यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हाजगोळी येथील प्रेम कण्णुटकर यांच्या घरात हा प्रकार घडला. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी अभिजीत अशोक पाटील, अधिन राजाराम कण्णुटकर, क्रांतीराज केदारी पाटील, आकाश दिनकर पाटील, केदारी लक्ष्मण पाटील, अशोक लक्ष्मण पाटील, विशाल कसे गावडे, दयानंद रामू पाटील व स्वप्नील जयवंत पाटील यांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या मुलाला देखील मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर फिर्यादी यांनी पाहुणे बाळकृष्ण बाबू बोकेडे, रा. बेळकुंडी, ता. जि. बेळगाव यांना घटनेची माहिती देण्यासाठी बोलावले असता त्यांनाही संबंधितांनी लाथाबुक्क्यांनी व हातातील कड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, “तुम्ही आमच्या नादास लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:34 am, August 23, 2026
27°C
घनघोर बादल
72 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:12 am
Sunset: 6:55 pm
Translate »
error: Content is protected !!