🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी : साईनाथ खंडेराय
नांदेड :- बिलोली तालुक्यात येणारा पोळा सण व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व डी.जे. मुक्त साजरा करावा, यासाठी पोलीस स्टेशन बिलोलीच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीला बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कल्पेश जाधव, महसूल विभागाचे नायब तहसीलदार मरले सर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. सुनील कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर चितळकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस.एस. देशमुख, पंचायत समिती अधिकारी पद्दमवार, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, पोलीस पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, नगर परिषदेचे कर्मचारी, नगरसेवक, सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सण उत्सव काळात घ्यावयाच्या अतिदक्षतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने लाईट व्यवस्था, रस्ते, क्रेन, बॅरिकेट, आरोग्य सेवा, विद्युत पुरवठा, कायदा व सुव्यवस्था आदी विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
या बैठकीचे सूत्रसंचालन मुकुंदर कुडके यांनी केले.



