🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड :- बिलोली पोलीस ठाण्यात तब्बल २१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, संपूर्ण पोलीस ठाण्याच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या संकल्पनेतून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
या मूर्ती स्थापनेसाठी ए.पी.आय विजय जाधव, पीएसआय विजय पंतोजी, शिवराज लोखंडे, सुरज कुमार तिडके, एएसआय चंदर आंबेवार, आनंद शिंदे, हेड कॉन्स्टेबल गंगाप्रसाद निरदोडे, शेख शब्बीर बेगर, गजानन अनमुलवार, कॉन्स्टेबल अंभोरे, तोटावार, वनशेट्टी, कोकरे, दुंपटवार, वच्चेवार, पवळे, कटारे, महिला पोलीस कर्मचारी सोळंके, इंगळे तसेच गृह रक्षक दलाचे समादेशक खंडू खंडेराय, होमगार्ड कसलोड, भालेराव, मालुसरे, गवळे, गाजेवार, शेख, मठपती, रोडोड, नरोड, फारोकी, बेग, वाघमारे, प्रविण गाजेवार, कोंडापल्ले, इरेवाड आणि लक्ष्मण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*डीजे मुक्त विसर्जन – ठरला चर्चेचा विषय*
दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले. विशेष म्हणजे या विसर्जन मिरवणुकीत डीजे ला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक भजन, टाळ-मृदंगाच्या गजरात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी ठेका धरत नाचत विसर्जन केले. यामुळे बिलोली पोलीस ठाण्याने एक आदर्श निर्माण केला आहे.
बिलोली पोलीस स्टेशन च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ही विसर्जन मिरवणूक बिलोली पोलीस ठाण्यापासून ते बागेतील हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर बाभळी येथील गोदावरी नदी पात्रात श्री गणरायाला निरोप देण्यात आला.
२१ वर्षांनंतर पोलीस ठाण्यात गणपती बसल्याने पोलीस कर्मचारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.



